कार टँकर अपघातात एक ठार, पाच जखमी | पुढारी

कार टँकर अपघातात एक ठार, पाच जखमी

कराड ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या कारची टँकरला पाठीमागून जोराची धडक बसली. या कार टँकर अपघातात एक ठार, तर पाचजण जमखी झाले. जखिणवाडी फाटा (ता. कराड) येथे शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

शकील जमाल शेख (वय 42, रा. स्कायसिटी, धानोर, पुणे) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. कारमधील रेश्मा शकील शेख (वय 41), सफा कागलकर (11), सबा कागलकर (12), मेहर कागलकर (7), मोहंमद कागलकर (2) अशी जखमींची नाव आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, हरिहर सुथन शिवकुमार (वय 27, रा. नागापट्टीनम, तामीळनाडू) हा कंटेनर घेऊन पुण्याकडे निघाला होता. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास कंटेनर कराडच्या हद्दीत जखिणवाडी फाट्याजवळ आल्यावर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने कंटेनरला जोराची धडक दिली.

या कार टँकर अपघातात कारमधील शकिल जमाल शेख हे जागीच ठार झाले. तर कारमधील रेश्मा शकील शेख, सफा कागलकर, सबा कागलकर, मेहर कागलकर, मोहंमद कागलकर हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी खासगी रूग्णालयात पाठवण्यात आले.

अपघाताची नोंद कराड शहर पोलिसात झाली असून कार चालक दत्तात्रय रमाकांत देसाई (27, रा. कर्वेनगर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक बी. एस. कांबळे करत आहेत.

Back to top button