Nashik Ganja Seized | कारमधून साडेसहा लाखाेंचा गांजा जप्त, दोघांना अटक

Nashik Ganja Seized | कारमधून साडेसहा लाखाेंचा गांजा जप्त, दोघांना अटक
Published on
Updated on

सिडको : पुढारी वृत्तसेवा – मुंबई – आग्रा महामार्गावरील गरवारे पॉईंट येथे वाहनांची तपासणी करताना कारमधून तब्बल ११ किलोच्या गांजा अंबड एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून कार व गांजासह सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता सोमवारी (दि. ३) पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

प्रदीप रामनारायण मौर्या (३८, रा. इंदिरानगर पोलिस चौकीसमोर, गणेश चाळ, गोळीबार रोड, खार पूर्व, मुंबई), मोहम्मद सिकंदर अब्दुल गफार शेख (५३, रा. न्यू जेडीएस बिल्डिंग, कोपचर पाडा, बाबानगर, विरार पूर्व, जि. पालघर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. चुंचाळे पोलिस चौकीचे अंमलदार श्रीहरी बिराजदार यांच्या फिर्यादीनुसार, गुन्हेशोध पथकाला अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, अंबड औद्योगिक वसाहतीतील मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉईंट याठिकाणी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी संशयित कार (एमएच ०१ इएम ५६५८) ची तपासणी केली असता त्यात ११.१६८ किलो वजनाचा १ लाख ३४ हजार १६ रुपयांचा गांजा मिळून आला. पोलिसांनी गांजासह५ लाखांची कार, दोन मोबाइल असा ६ लाख ४७ हजार १६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news