सातारा : फलटणमध्ये ओढ्यातील पुरात कार बुडाली; वडिलांसह मुलीचा मृत्यू | पुढारी

सातारा : फलटणमध्ये ओढ्यातील पुरात कार बुडाली; वडिलांसह मुलीचा मृत्यू

सातारा; पुढारी वृत्तसेवा : फलटण येथील सोमंथळी येथे ओढ्याला आलेल्या पुरात पाण्याचा अंदाज न आल्याने कार बुडून वडील आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत छगन मदने आणि मुलगी प्रांजल मदने (वय १३ वर्ष) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वत्र पूर परिस्थिती ओढावली आहे. नदी- नाले भरून वाहू लागले आहेत. याच दरम्यान फलटणमध्ये मध्यरात्री ओढ्याच्या आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने कार बुडाली. या कारमध्ये असलेले वडील आणि मुलीचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आज मंगळवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने ही कार बाहेर काढली. मात्र, या घटनेत माण तालुक्यातील वारूगड येथील छगन मदने आणि त्यांची मुलगी प्रांजल मदने यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचलंत का? 

Back to top button