सातारा : वहागाव येथे वृत्तपत्र विक्रेत्याला मारहाण | पुढारी

सातारा : वहागाव येथे वृत्तपत्र विक्रेत्याला मारहाण

तासवडे टोलनाका; पुढारी वृत्तसेवा : वहागाव (ता. कराड) येथे वृत्तपत्र विक्रेत्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद विजय दिनकर पवार यांनी तळबीड पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी संजय निवृत्ती पवार, राजेंद्र निवृत्ती पवार, आकाश राजेंद्र पवार, रोहित दादासो पवार, आदित्य राजेंद्र पवार, अर्जुन दादासो पवार, विश्वजीत कृष्णा पवार, विवेक कृष्ण पवार यांच्यासह दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांच्या कडून दिलेली माहिती अशी, राजेंद्र दिनकर पवार हे वहागाव येथे वृत्तपत्र टाकण्याचे काम करतात. गेले पंधरा दिवसांपासून राजेंद्र आजारी असल्यामुळे त्यांचे भाऊ विजय वर्तमानपत्र टाकत होते. गावातील किल्ला गल्लीत वर्तमानपत्र टाकण्यासाठी गेले असता संजय, राजेंद्र निवृत्ती पवार, आकाश, रोहित, आदित्य, अर्जुन, विश्वजीत, विवेक यांनी विजयकडे वर्तमानपत्र टाकायचे असतील तर महिन्याला ५ हजार रूपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने बुधवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास त्यांनी राजेंद्रच्या घरी जाऊन मारहाण केली. यावेळी राजेंद्र यांच्या कुटुंबातील सद्स्यांनाही मारहाण करण्यात आली. याबाबतची फिर्याद विजय दिनकर पवार यांनी दिली आहे.

दरम्यान आकाश राजेंद्र पवार यानेही विजय दिनकर पवार, धनाजी विलास पवार, तानाजी विलास पवार, दीपक विलास पवार, सचिन दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र दिनकर पवार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्याने फिर्यादित म्हटले आहे की, त्याचे चुलते संजय निवृत्ती पवार हे बुधवारी रिक्षा घेऊन घरी येत असताना राजेंद्र व त्याच्या कुटुंबियांनी त्यांना मारहाण केली व सुमारे १ लाख रूपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून घेतली.

हेही वाचा :

Back to top button