Army Dog Zoom : दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या लष्करी श्वान ‘झुम’चे निधन

Army Dog Zoom : दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या लष्करी श्वान ‘झुम’चे निधन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या लष्कराच्या श्वानाचे गुरुवारी (दि. 13) दुपारी निधन झाले. दहशतवाद्यांची गोळी लागून जखमी झालेला श्वान 'झूम'वर 54 अॅडव्हान्स फील्ड व्हेटर्नरी हॉस्पिटल (54 AFVH) मध्ये उपचार सुरू होते. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 11.45 वाजेपर्यंत झूमची प्रकृती ठीक होती आणि तो उपचाराला चांगला प्रतिसाद देत होता, पण त्यानंतर अचानक त्याची प्रकृती बिघडली आणि त्याने 12 वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी, बेल्जियन मालिनॉइस जातीच्या झूमने अनंतनागमधील एका घरात लपलेल्या दोन दहशतवाद्यांना शोधण्यात मोठी भूमिका पार पाडली होती. त्यानंतर भारताच्या जवानांनी त्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. (Army Dog Zoom Who Helped Kill 2 Terrorists In Kashmir Dies Of Injuries)

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत झूमचा मागचा पाय फ्रॅक्चर झाला होता. तसेच त्याच्या चेहऱ्यावरही जखम झाल्या होत्या. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी (दि. 10) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी झूमच्या मदतीने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. चकमकीदरम्यान गोळी लागल्याने झूम गंभीर जखमी झाला होता.

ऑपरेशन दरम्यान झूमकडे मोठी जबाबदारी

दहशतवादी ज्या घरात लपले होते ते घर शोधण्याचे काम झूमकडे सोपवण्यात आले होते. या उच्च प्रशिक्षित श्वानाने दहशतवाद्यांची ओळख पटताच त्या घरात घुसून दहशतवाद्यांवर हल्ला केला. ऑपरेशन दरम्यान कुत्र्याला दोन गोळ्या लागल्या आणि तो गंभीर जखमी झाला. गोळ्या लागूनही झूमने लढा दिला. त्याने आपले कार्य पूर्ण केले. परिणामी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. झूमने पूर्वीही अनेक सक्रिय मोहिमांचा एक भाग होता. त्या चकमकीत दोन जवानही जखमी झाल्याचे लष्करी अधिका-यांनी सांगितले. (Army Dog Zoom Who Helped Kill 2 Terrorists In Kashmir Dies Of Injuries)

30 जुलै रोजी 'एक्सल' हे श्वानही झाले होते

झूमच्या आधी या वर्षी 30 जुलै रोजी आर्मी डॉग एक्सलनेही अशाच प्रकारे दहशतवाद्यांशी लढला होता. मात्र त्या लढ्यात तो शहीद झाला. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त एक्सेल श्वानाला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान त्याच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news