सातारा: मातीचा ढिगारा अंगावर पडून दोन परप्रांतीय मजूरांचा मृत्यू | पुढारी

सातारा: मातीचा ढिगारा अंगावर पडून दोन परप्रांतीय मजूरांचा मृत्यू

उंब्रज (सातारा), पुढारी वृत्तसेवा : शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत पाईप वेल्डींग व ब्रॅन्डींगचे काम खड्ड्यात उतरुन सुरू असताना अंगावर मातीचा ढिगारा पडला. यामध्ये दबून दोन परप्रांतीय मजूरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.४) रात्री घडली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा उंब्रज पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. साहिलकुमार ओमकार चाँद (वय २६, रा. पठाणकोट, पंजाब ), सुखेदु बिकास बेरा (वय २२ रा. प. बंगाल) अशी दुर्घटत मृत्‍यू झालेल्‍यामजूरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मंगळवारी (दि.४) ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गाच्याकडेला कराड ते सातारा जाणाऱ्या लेनकडेला एका हॉटेलशेजारी एसीई पाईप लाईन क्रॉन्ट्रक्ट प्रा. लिमिटेड या कंपनीचे कामगार पाईप वेल्डींग व ब्रॅन्डींगचे काम खड्ड्यामध्ये उतरुन करीत हाेते. अचानक दोन कर्मचाऱ्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडला. ते दोघे ढीगा-याखाली दबले गेले. लोकांच्या मदतीने कामगारांना बाहेर काढले. मात्र उपचारादरम्‍यान त्‍यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अमितकुमार बीपीनकुमार सिन्हा यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा

Back to top button