नाशिक : दांडिया खेळण्यावरून वाद ; युवकाचा धारदार शस्त्राने खून | पुढारी

नाशिक : दांडिया खेळण्यावरून वाद ; युवकाचा धारदार शस्त्राने खून

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिक – पुणे महामार्गावरील विजय ममता सिनेमागृहसमोर असलेल्या शिवाजीनगर वसाहतीत दोन गटात दांडिया खेळण्यावरून वाद झाला. वादाचे पर्यवसन टोकाला गेल्याने युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परीसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यात तीन जण अल्पवयीन आहेत.

बाबू लोट असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. बाबू व इतर चार ते पाच कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याचे रूपांतर शिवीगाळ व हाणामारी झाले. त्यानंतर संतप्त झालेल्या मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राच्या सहाय्याने बाबू लोट याच्यावर गंभीर हल्ला करून त्याला जखमी केले. दरम्यान या घटनेनंतर दांडिया खेळणाऱ्यांमध्ये घबराहट निर्माण  होऊन उपस्थितांमध्ये धावपळ झाली. बाबू लोट याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान बुधवारी, दि.5 सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर उपनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही घटना समजताच पोलीस उपायुक्त विजय खरात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

हेही वाचा:

Back to top button