नाशिक : नऊ वर्षानंतर नासाकाचा बॉयलर पेटणार; ३.५० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट | पुढारी

नाशिक : नऊ वर्षानंतर नासाकाचा बॉयलर पेटणार; ३.५० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिक सहकारी साखर कारखाना लिमिटेड पळसे संचलित मे दीपक बिल्डर अँड डेव्हलपर नाशिकरोड या साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपण समारंभ ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१५ वाजता परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्यासह कार्यक्षेत्रातील ११ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते होत असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सुकदेव शेटे यांनी दिली.

तब्बल नऊ वर्ष बंद असलेला नासिक सहकारी साखर कारखाना खासदार हेमंत गोडसे व त्यांचे सहकार्यांनी मे दीपक बिल्डर अँड डेव्हलपर्स यांचे माध्यमातून सुरू केला आहे, चाचणी गळीत हंगाम यशस्वी झाल्यानंतर २०२२-२३ चे गळीत हंगामाची कारखान्याकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे, कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ रोजी होत असून त्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गटातील एका ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते सहपत्नीक विधिवत पूजा केली जाणार आहे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन खासदार हेमंत गोडसे उपस्थित राहणार आहे. तर याप्रसंगी कारखान्याचे संचालक दीपक चांदे, शेरझाद पटेल, सागर गोडसे यांचे सह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत, या गळीत हंगामासाठी कारखान्याने 3.50 लाख मे टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले असून ते साध्य करण्यासाठी कारखाना मशनरी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे, तसेच ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे, त्यांना आवश्यक तो ऍडव्हान्स वाटप करून शेतकी विभागामार्फत ऊस तोडणीचे अचूक नियोजन केले गेलेले आहे, नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्रंबकेश्वर या चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याचे भवितव्य अतिशय उज्वल असून त्या माध्यमातून शेतकरी, कामगार, शेतमजूर यांचे सह कारखाना कार्यस्थळावरील विविध व्यवसायिकांना मोठा आधार मिळणार आहे. कारखान्याचा सन २०२२-२३ चा गळीत हंगाम टर्निंग पॉईंट ठरणार असून या हंगामाच्या बॉयलर अग्निपदीपन समारंभात कार्यक्रमास शेतकरी, कामगार, ऊस उत्पादक व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कारखाना संचालक मंडळ, कार्यकारी संचालक सुकदेव शेटे सह प्रशासनाने केली आहे.

हेही वाचा:

Back to top button