सांगली : लोकप्रतिनिधी देशासाठी घातक : संभाजी भिडे | पुढारी

सांगली : लोकप्रतिनिधी देशासाठी घातक : संभाजी भिडे

सांगली; पुढारी वृत्तसेवा : खासदार, आमदारांसह इतर लोकप्रतिनिधी हे देशासाठी घातक आहेत, अशा शब्दात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांवर टीका केली. आज सांगली येथे शिवप्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात आलेल्या श्रीदुर्गामाता दौड समारोप प्रसंगी ते बोलत होते.

सांगलीत नवरात्रौत्सवनिमित्त दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येते. यामध्ये हजारो लोक सहभागी होत असतात. शिवप्रतिष्ठानच्या वतीनेही दौडचे आयोजन करण्यात आले होते. आज शिवप्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात आलेल्या श्रीदुर्गामाता दौडीची सांगता करण्यात आली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी लोकप्रतिनिधी देशासाठी घातक असल्याचे वक्तव्य केले. या दौडमध्ये पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह हजारो धारकरी सहभागी झाले होते.

हेही वाचा :

Back to top button