सातारा : छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतले भवानी मातेचे दर्शन | पुढारी

सातारा : छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतले भवानी मातेचे दर्शन

प्रतापगड: पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण महाराष्ट्राची आराध्य दैवत असलेल्या आई भवानी मातेच्या दर्शनासाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज (दि.४) सकाळी आई भवानीचा अभिषेक करुन आरती केली. आज नवमी असल्याने किल्ले प्रतापगडवर नवचंडी यज्ञ करण्यात आला.

घटस्थापनेच्या दिवशी दोन घट बसवण्याची परंपरा आहे. त्या दिवशी संकल्प सोडून नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो. दसऱ्याला नवरात्रौत्सवाची सांगता होते. नऊ दिवस विविध कार्यक्रम श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येतात.

प्रतापगडावरील विविध कामांबाबत येत्या काही दिवसात सातारा येथे मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक होणार असल्याचे खासदार उदयनराजे यांनी यावेळी सांगितले. यावेळी किल्ले प्रतापगडचे किल्लेदार अभयसिंह हवालदार, श्रीकांत फडणीस, आनंद उतेकर, विलास मोरे, ओमकार देशपांडे, विलास जाधव, विजय कासुर्डे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचलंत का ?

Back to top button