सातारा : येरवडा कारागृहातून कुख्यात गुंडाचे लोणंदमधील व्यापाऱ्याला पत्र; ५० लाखांची केली मागणी | पुढारी

सातारा : येरवडा कारागृहातून कुख्यात गुंडाचे लोणंदमधील व्यापाऱ्याला पत्र; ५० लाखांची केली मागणी

लोणंद; पुढारी वृत्तसेवा : लोणंद येथील व्यापारी अमित तापडिया यांना कुख्यात गुंड परवेज हनिफ शेख याने येरवडा जेल मधून पत्र पाठवून ५० लाख रुपयांची मागणी केली आहे. या प्रकरणी शेख याच्याविरोधात लोणंद पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणंद येथील प्रसिद्ध व्यापारी व कुमार गॅस एजन्सीचे मालक अमित तापडिया यांना स्पीड पोस्टने मंडल तुरंगाधिकारी येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथुन लिफाफा मिळाला. त्यांनी लिफाफा उघडून पाहिला असता चंदन शेवाणी यांचे हत्याकांडमध्ये येरवडा जेलमध्ये असलेल्या परवेज हानिफ शेख याने पाठवल्याचे समजले.

या पत्रात म्हटले होते की, लोणंद येथील जमीन गट नं ४१४ मधील २७ एकर जमीन आहे. जमिनीची किंमत सुमारे 30 कोटी एवढी आहे. या जमिनीचे काम अधिकृतपणे करण्‍यासाठी मला ५० लाख रुपयांची गरज आहे.  तुझ्याकडे भरपूर रुपये आहेत. त्यातील थोडीफार रक्कम मला दिली तर तुला काही फरक पडणार नाही. सध्या मी अरुण जनार्दन डाके, अरबाज बशीर शेख असे तिघेजण एकत्र आहे. मागितलेली रक्कम ही चेष्टेवारी घेवु नको, मला पैशांची गरज आहे, हे लक्षात ठेव व तुझा निर्णय वकिलामार्फत मला पाठवण, अशा मजकुरचे पत्र शेख याने हिंदी भाषेत पाठवले होते.

पत्र मिळाल्‍यानंतर अमित तापडिया यांनी लोणंद पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी परवेज हनिफ शेख याच्याविरुदध लोणंद पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. तपास लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button