लोणंद : वीर धरणाचे दरवाजे उघउले; निरा नदीवरील पूल पाण्याखाली, लोणंद-वीर मार्ग वाहतूकीस बंद | पुढारी

लोणंद : वीर धरणाचे दरवाजे उघउले; निरा नदीवरील पूल पाण्याखाली, लोणंद-वीर मार्ग वाहतूकीस बंद

लोणंद : पुढारी वृतसेवा वीर धरणातून मोठया प्रमाणावर पाणी निरा नदीत सोडण्यात आल्याने वाठार कॉलनी-वीर दरम्यानचा निरा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे लोणंद – वीर सासवड मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

खंडाळा तालुक्यातील वीर धरण शंभर टक्‍के भरले असुन, वीर धरणातून 42933 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वीर धरण 100% भरले असून, भाटघर धरणात 91% पाणी साठा, नीरा देवघर धरणात 88% पाणीसाठा, तर गुंजवणा धरणात 100% पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वीर धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

आज (शुक्रवार) सकाळी 6.30 वाजता वीर धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी वीरधरणाचे सर्व नऊ गेट चार फुटाने उघडण्यात आले. निरा नदीत 42933 कयूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. निरा दत्त घाटावरील दत मंदिरही पाण्याखाली गेले आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होणार असुन, नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्‍या आहेत. नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा :  

Back to top button