सातारा : कोयना धरणाचे ६ वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, नदीपात्रात प्रतिसेकंद १० हजार १०० क्यूसेक विसर्ग (व्हिडिओ) | पुढारी

सातारा : कोयना धरणाचे ६ वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, नदीपात्रात प्रतिसेकंद १० हजार १०० क्यूसेक विसर्ग (व्हिडिओ)

पाटण; पुढारी वृत्तसेवा : १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात शुक्रवारी सकाळी उपलब्ध पाणीसाठा ८७.६० टीएमसी इतका झाला. १७.६५ टीएमसी पाणी सामावून घेण्याची क्षमता शिल्लक असून त्यानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरेल. सध्या प्रतिसेकंद सरासरी 50 हजार क्युसेक पाण्याचा आवक असतानाही महापुराची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने शुक्रवारी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे ६ वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलण्यात आले. त्यामुळे कोयना नदी पात्रात प्रतिसेकंद १० हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पूर्वेकडील पाटणसह कराड तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे कोयना व कृष्णा नदी पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदी पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाकडून याबाबत योग्य ती खबरदारी व उपाययोजना सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे ६ वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलण्यात आले. त्यामुळे प्रतिसेकंद ८ हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तसेच पायथा वीज गृहातील दोन जनित्रांद्वारे वीज निर्मिती करून २ हजार १०० क्यूसेक असे एकूण प्रतिसेकंद १० हजार १०० क्यूसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली तरच यापेक्षा अधिक जादा पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button