सांगली : पलूसमध्ये मनसे जिल्हा उपाध्यक्षावर चाकूहल्ला | पुढारी

सांगली : पलूसमध्ये मनसे जिल्हा उपाध्यक्षावर चाकूहल्ला

पलूस; पुढारी वृत्तसेवा : पलूस येथे मनसे जिल्हा उपाध्यक्षावर आज (दि.१०) भरदुपारी चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी दादा गायकवाड (पूर्ण नाव माहित नाही, रा. पलूस) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अविनाश संभाजी जाधव (वय ४५ वर्ष) रा.बांबवडे ता पलुस यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश संभाजी जाधव (रा, बांबवडे) हे आपल्या कामानिमित्त पलूस येथे आले होते. आपले काम आटपून दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीवरून बांबवडेला जात होते. यावेळी आंधळी रोड येथील एका दुकानासमोर संशयित आरोपीने पाठीमागून त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. यात जाधव गंभीर जखमी झाले. जखमी फिर्यादी जाधव यांनी अवैध व्यवसायाबद्दल पलूस पोलीस ठाणे येथे लेखी निवेदन दिले होते. त्याचा राग मनात धरून गायकवाड याने जाधव यांना दमदाटी करून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. याप्रकरणी गायकवाड याला ताब्यात घेऊन पोलिसांनी कारवाई केली असून याबाबत पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले , सपोनि प्रवीण साळुंखे करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button