T20 World Cup 2024:पाकिस्‍तान संघ निवडीचे घोडे अडले कोठे?,’पीसीबी’ने सांगितले कारण | पुढारी

T20 World Cup 2024:पाकिस्‍तान संघ निवडीचे घोडे अडले कोठे?,'पीसीबी'ने सांगितले कारण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आगामी T20 विश्‍वचषक स्‍पर्धेकडे वेधले आहे. या स्‍पर्धेसाठी संघ निवड जाहीर करण्‍यास आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी ) १ मेपर्यंतची मुदत दिली होती. त्‍यानुसार भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ओमान आणि कॅनडा यांनी त्यांच्या संघांची घोषणा केली आहे. मात्र पाकिस्‍तानचा संघ अद्‍याप जाहीर झालेला नाही. यासंदर्भात पाकिस्‍तान क्रिकेट मंडळाने ( पीसीबी) कारण सांगितले आहे.

केव्‍हा होणार पाकिस्‍तान क्रिकेट संघाची घोषणा?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी T20 विश्वचषकासाठी संघाची वेळेवर घोषणा केलेली नाही. यसीसीने संघांची घोषणा करण्याची अंतिम मुदत 1 मे निश्चित केली होती, ज्यामध्ये 25 मे पर्यंत बदल केले जाऊ शकतातपीसीबीने म्‍हटलं आहे की, काही खेळाडू फिटनेसच्या समस्यांशी झुंजत आहेत. त्‍यामुळे संघाचीनिवड 23 किंवा 24 मे रोजी होण्‍याची शक्‍यता आहे.

खेळाडूंच्‍या फिटनेसबाबत निवडकर्ते चिंताग्रस्‍त

मोहम्मद रिझवान, आझम खान, इरफान खान नियाझी आणि हॅरिस रौफ यांच्‍या दुखापतीबाबत पाकिस्‍तान संघाचे व्यवस्थापन आणि निवडकर्ते चिंताग्रस्‍त आहे. आता आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्‍या सामन्‍या आधी या खेळाडूंची फिटनेसची चाचणी घेतली जाणार आहे. निवडकर्ते गुरुवारी आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघाची नावे देणार असून, विश्वचषक संघाची घोषणा करण्यापूर्वी त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करतील, असेही ‘पीसीबी’ने स्‍पष्‍ट केले आहे.

संघ निवडीत विलंबाने काही फरक पडत नाही कारण सर्व संघ २४ मे पर्यंत बदल करू शकतात. यानंतर जे बदल केले जातील ते फिटनेस किंवा दुखापतीच्या आधारावर असतील, त्यासाठी आयसीसीच्‍या तांत्रिक समितीची परवानगी घ्यावी लागेल. यामुळेच पीसीबी आणि निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यापर्यंत संघ जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button