सांगली : विटा नगरपालिका तिसरी; मिळाले एक कोटींचे बक्षीस | पुढारी

सांगली : विटा नगरपालिका तिसरी; मिळाले एक कोटींचे बक्षीस

विटा; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्यावतीने मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत विटा पालिकेने तिसर्‍या नंबरचे एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळविले आहे. विभागीय आणि राज्यस्तरीय अशा दोन प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली. यात विभागीय स्पर्धेच्या निकषानुसार विटा पालिकेने अ आणि ब पालिका वर्गवारीत विभागस्तरीय तिसरा नंबर पटकावला आहे.

यामुळे विटा नगरीच्या नावलौकिकात पुन्हा एकदा भर पडली आहे. स्वच्छ सर्वेक्षणमधील भरघोस यशानंतर मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेतील विट्याचे यश कौतुकास्पद आहे. मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा 2023 मध्ये पुणे विभागामधील अ आणि ब नगरपरिषदांमध्ये तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल पुणे विभागीय आयुक्तांनी विटा पालिकेचे अभिनंदन केले आहे. विटा शहर विकासाबद्दलची बांधिलकी बाळगून आहे, तसेच सक्षम शहर बनवण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विकास करण्याकरिता कायमच अग्रेसर आहे.

मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेतील मूल्यांकन आणि निकष याप्रमाणे काम करण्याकरिता पालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि जनता यांचे योगदान मोलाचे आहे, अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील आणि उपमुख्याधिकारी स्वप्निल खामकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच प्रशासक डॉ. विक्रम बांदल यांनीही सर्व विटेकरांचे अभिनंदन केले आहे. हे यश आपल्या सर्व विटा नगरवासीयांचे असून असेच सहकार्य पुढे देखील मिळावे, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

Back to top button