सांगली : चारा कटर मशीनचा शॉक लागून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू | पुढारी

सांगली : चारा कटर मशीनचा शॉक लागून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू

जत; पुढारी वृत्तसेवा : चारा कटिंगचे मशीन सुरू असताना विजेचा धक्का लागून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ओंकार शिवाजी शेळके (वय १५) असे मयत शाळकरी विद्यार्थ्यांचे नाव आहे. ही घटना पाच्छापूर (ता. जत) येथे घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ओंकार हा इयत्ता पाचवीमध्ये पाच्छापूर हायस्कूल येथे शिक्षण घेत होता. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर वाघे वस्ती येथे स्वतःच्या शेतातील जनावरांना चारा कटिंग करून टाकण्यासाठी मशिन सुरू केली होती. दरम्यान त्याला विजेचा शॉक लागला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. जत ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. जत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

हेही वाचा :

Back to top button