सांगली : रेड येथील मारामारीत दोन गटातील तीन जण जखमी; परस्पर विरोधी फिर्याद दाखल | पुढारी

सांगली : रेड येथील मारामारीत दोन गटातील तीन जण जखमी; परस्पर विरोधी फिर्याद दाखल

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : रेड ( ता.शिराळा) येथे जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये इंद्रजीत पंढरीनाथ कांबळे (वय २७ ) हा जखमी झाला. तर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत रोहन अशोक पाटील, अनिरुद्ध अशोक पाटील यांना कोयता, काठी व रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.२७ रोजी रात्री घडली आहे.

याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, तुषार संजय सातपुते ( वय ३२, रा. रेड हरिजन वस्ती ) यांनी दिलेल्या फिर्यादीत अशोक ब्रम्हदेव पाटील, अनिरुध्द अशोक पाटील, रोहन अशोक पाटील यांनी पुर्वीच्या भांडणाचा वादातून इंद्रजीत पंढरीनाथ कांबळे( वय २७) यास लाथाबुक्कयांनी मारहाण केली. त्यास उपचारासाठी दवाखान्यात नेत असता फिर्यादि तुषार सातपुते यांना जातीवाचक शिवीगाळ केली आहे असे म्हंटले आहे. याचा पुढील तपास विभागीय पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण करीत आहेत.

तर रोहन अशोक पाटील (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीत संशयित आरोपी इंद्रजित पंढरीनाथ कांबळे याने गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून तुषार संजय सातपुते, राहुल भगवान सातपुते या तिघांनी कोयता, काठी आणि रॉडने मारहाण करून रोहन पाटील, अनिरुद्ध अशोक पाटील या दोघांना मारहाण करून केली असे म्हंटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार भाऊसाहेब कुंभार करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button