सांगली : कौठूळीचे उपसरपंच सुभाष पाटील यांचा अपघाती मृत्यू | पुढारी

सांगली : कौठूळीचे उपसरपंच सुभाष पाटील यांचा अपघाती मृत्यू

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : कौठूळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष शामराव पाटील वय ५७ यांचा आज अपघाती मृत्यू झाला. शनिवारी (दि.६) सायंकाळी ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी सुभाष पाटील हे आज बँकेचे कामकाज झाल्यावर घरी निघाले. सायंकाळी ५.३० च्या सुमारास आटपाडी-दिघंची रस्त्यावरून आटपाडीहून कौठुळी कडे निघाले होते.

सावित्रीदेवी कॉटन मिल जवळ त्यांच्या मोटरसायकलची आणि दिघंचीहून येणाऱ्या मोटारसायकलची जोरदार धडक झाली. या अपघातात फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. पाटील यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या मोटारसायकलवरील मिटकी जिल्हा सोलापूर येथील दोन युवक गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सुभाष पाटील यांच्या आकस्मित अपघाती मृत्यूनंतर कौठूळी आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button