Uddhav Thackeray : कोकणच्या माणसावर दडपशाही केली तर महाराष्ट्र पेटवू – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : कोकणच्या माणसावर दडपशाही केली तर महाराष्ट्र पेटवू – उद्धव ठाकरे

महाड; पुढारी ऑनलाईन : ज्याना सर्वकाही दिलं, ते गद्दारी करुन गेले. परंतु, जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, ते आज माझ्या बरोबर आहेत. मी सत्तेस नाही तरी ते माझ्या बरोबर आहेत. उपर्‍यांच्या सुपार्‍या घेऊन गद्दार नाचत आहेत. परंतु, मी कोकणच्या माणसासोबत आहे. विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही. तुम्हाला प्रकल्प आणायचे असतील तर चांगले प्रकल्प आणा. माझ्या कालखंडात चांगले प्रकल्प आले, ते तूम्ही गुजरातला दिले. म्हणजे गुजरातला रांगोळी आणि आम्हा राख देता का? असा सवाल यांनी ठाकरे यांनी केला. जर आमच्या माणसांवर तुम्ही दडपशाही केली, पोलिसांकरवी अत्याचार केले, तर आम्ही अखंड महाराष्ट्र पेटऊ आणि उठऊ, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. (Uddhav Thackeray)

महाड येथे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी बारसु प्रकल्पाबाबत भाष्य करत प्रकल्पाच्या बाजुने असणाऱ्यांचा चांगला समाचार घेत विनाशकारी प्रकल्पाला विरोध करत कोकणवासियांच्या बाजून राहू असे आश्वासन दिले. (Uddhav Thackeray)

यावेळी व्यासपिठावर माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते, खासदार अरविंद सावंत, ठाकरे गटात प्रवेश घेतलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, नानासाहेब जगताप, माजी मंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, सुषमा अंधारे आदी मान्यवर उपस्थित होते. (Uddhav Thackeray)

बारसु प्रकल्पाबाबत बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, स्थानिकांचा विरोध असेल तर आम्हाला प्रकल्प नको. बारसूत अंखंड महाराष्ट्रातील पोलीस आणून जो अत्यांचार सुरु आहे. तो त्वरित थांबवा. आमचा अंत पाहू नका. असा इशारा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, की चीन भारताचे लचके तोडत आहेत, ते तुम्हाला दिसत नाही आणि बारसूत येऊन दादागिरी करता, हे कुठल्या समाजसेवेत बसते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news