इस्लामपूर : कोंबड्या अंगणात सोडल्याच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी; पेठ येथील घटना | पुढारी

इस्लामपूर : कोंबड्या अंगणात सोडल्याच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी; पेठ येथील घटना

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : पेठ (ता. वाळवा) येथे कोंबडीची पिल्ले अंगणात सोडल्याच्या वादातून दोन कुटुंबात रविवारी सकाळी हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

एका गटाकडील सुरेश बबन जाधव, छाया सुरेश जाधव, रोहिणी सुरेश जाधव, मोहिनी सुरेश जाधव तर दुसर्‍या गटाकडील वर्षा पांडुरंग जाधव (सर्व रा. पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. वर्षा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी सायंकाळी वर्षा यांचा मुलगा दर्शन आणि मुलगी धनश्री हे घरासमोर खेळत होते. रोहिणी हिने अंगणात खेळायचे नाही, असे म्हणून मुलीच्या पायावर दगड मारला. वर्षा याचा जाब विचारायला गेले असता मुलगा दर्शन याला संशयिताने दगडाने मारहाण केली. छाया जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वर्षा जाधव हिने कोंबडीची पिल्ले अंगणात सोडली होती. यावरून छाया आणि वर्षा यांच्यामध्ये वाद झाला. वर्षा हिने तेथे पडलेला दगड उचलून छाया यांना मारहाण केली.

Back to top button