सांगली : डफळापूरजवळ झालेल्या दुचाकी अपघातातील जखमीचा मृत्यू | पुढारी

सांगली : डफळापूरजवळ झालेल्या दुचाकी अपघातातील जखमीचा मृत्यू

जत; पुढारी वृत्तसेवा : डफळापूरजवळ (ता.जत) दोन दुचाकीच्या धडकेत दोन जण जखमी झाले होते. दरम्यान, राजेंद्र गुरुबाळ मुचंडी (कर्नाटक) यांचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. घटनास्थळावरून दुचाकीस्वार फरार झाला होता. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली होती.

याप्रकरणी बेकायदेशीरपणे व हलगर्जीपणे मोटरसायकल चालवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत जखमी महातेस बसवराज इकळकी (रा. मतकुणकी ता. इंडी, जि. विजयपूर) याने फिर्याद दिली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, कर्नाटक येथील मामा – भाचे कोकळे ते विजापूर असा मोटर सायकल (क्रमांक. एमएच के. ए. २८ इएक्स ९५०२) वरून प्रवास करत होते. कोकळे येथील पुल ओलांडून डफळापूरच्या हद्दीत आले असता अज्ञात दुचाकीस्वाराने वाहतुकीचे नियम मोडत चुकीच्या बाजूने येऊन दुचाकीला धडक दिली. यावेळी महातेस इकळकी हे जखमी झाले. त्यांचे मामा राजेंद्र मुचंडी हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान मुचंडी यांचा शनिवारी मृत्यू झाला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button