सांगली: आंतरराष्ट्रीय अतिदक्षता विशारद परीक्षेत डॉ. शीतल पवार यांचे यश | पुढारी

सांगली: आंतरराष्ट्रीय अतिदक्षता विशारद परीक्षेत डॉ. शीतल पवार यांचे यश

जत; पुढारी वृत्तसेवा : जत येथील डॉ. शीतल चन्नाप्पा पवार यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आंतरराष्ट्रीय अतिदक्षता विशारद (EDAIC) या परीक्षेत यश मिळवले. पोर्तुगाल देशातील पोर्टो शहरात झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. डॉ. पवार आंतरराष्ट्रीय परीक्षेत यश संपादन करणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या डॉक्टर ठरल्या आहेत. सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. पवार यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन केटीके आऊटस्टँडिंग आचिव्हर्स अँड एज्युकेशन फाउंडेशन तर्फे भारत गौरव पुरस्कार दिल्ली येथे प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील गुणवत्ताधारक व दर्जेदार कार्यासाठी प्रदान करण्यात येतो. डॉ. पवार या वैद्यकीय क्षेत्रात (डी.एन.बी) कार्डियोलॉजी सुपर स्पेशालिस्ट (हृदयरोग विशेषज्ञ) म्हणून काम करीत आहेत. त्यांनी कोरोना महामारीच्या काळात मुंबई येथे दहा हजारहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.

डॉ. पवार माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सी. बी. पवार यांच्या कन्या आहेत. त्यांना वडील माजी जिल्हा शल्यचिकित्सक (कोल्हापूर) डॉ. सी. बी. पवार, आई डॉ. अनिता पवार, डॉ. वैभव पवार, डॉ. योगेश राठोड, (क्रिटिकल केअर) यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button