Vamika: वामिकासोबतचे फोटो शेअर करत अनुष्‍का म्‍हणाली, 'प्रार्थना आणि प्रेम...'  | पुढारी

Vamika: वामिकासोबतचे फोटो शेअर करत अनुष्‍का म्‍हणाली, 'प्रार्थना आणि प्रेम...' 

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गेले काही वर्षे फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. साधारणत: चार वर्षे ती कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. आता तब्बल चार वर्षानंतर ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करतेय. चकदा एक्सप्रेस चित्रपटाच्‍या शुटींगसाठी अनुष्‍का कोलकाता येथे गेली. शुटींगच्या  बिझी शेड्युल्डमधून वेळ काढून तिने आपली मुलगी वामिकासोबत (Vamika ) शहर फिरायला गेली होती. अनुष्काने आपल्या मुलीबरोबरचे फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.

Wamika

Vamika : कालीघाट मंदिराचे दर्शन 

अनुष्का शर्मा सध्या चकदा एक्सप्रेस फिल्मच्या शुटींगसाठी कोलकातामध्‍ये आहे. अनुष्काने (Anushka Sharma) कोलकातामधील कालीघाट मंदिराचे दर्शन घेतले. तसेच  वेगवेगळ्या डिशेजचाही तिने आस्वाद घेतला.  यातील काही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने सलवार कुर्तीज घातली आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरुन कौतूक केले आहे.

Wamika
Wamika

चकदा एक्सप्रेसमधून अनुष्‍काचे कमबॅक 

अनुष्का शर्मा फिल्म चकदा एक्सप्रेसमधून चारवर्षांनंतर चित्रपटसृष्‍टीत कमबॅक करतेय. २०१८ मध्‍ये झिरो या फिल्ममध्ये ती दिसली होती.  या फिल्ममध्ये शाहरुख खान, कॅटरिना कैफ हेही होते. ही फिल्म बॉक्स ऑफिसवर चालली नाही. आता तिची चकदा एक्सप्रेस ही फिल्म येणार आहे.

यात अनुष्‍का  महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिची भूमिका साकारत आहे. लवकरच तिची ही फिल्म प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा

 

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

Back to top button