गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार | पुढारी

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम चालू आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका एकत्रितपणे जाहीर केला जाण्याची शक्यता होती. मात्र, आयोगाने केवळ हिमाचलचा निवडणूक कार्यक्रम काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता.

दोन टप्‍प्‍यात मतदान होण्‍याची शक्‍यता

हिमाचलमध्ये एकाच टप्प्यात १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. गुजरातचा विचार केला, तर या राज्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दोन टप्प्यात मतदान घेतले जाण्याची शक्यता आहे. गुजरातचा निकाल हिमाचलसोबत ८ डिसेंबरला जाहीर केला जाऊ शकतो, असे आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे. गुजरातच्या अनेक भागात सप्टेंबरमध्ये पूर आला होता. त्यामुळे येथील निवडणुकीचा कार्यक्रम हिमाचलसोबत जाहीर करता आला नव्हता, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button