सांगली : उद्योग कोणत्या राज्यात जाणार हा निर्णय उद्योगपती घेत असतात : शायना एन.सी | पुढारी

सांगली : उद्योग कोणत्या राज्यात जाणार हा निर्णय उद्योगपती घेत असतात : शायना एन.सी

सांगली, पुढारी वृत्तसेवा : मेक इन इंडियाला सीमांचे बंधन नाही. उद्योग कोणत्याही राज्य जावोत, त्याचे स्वागतच आहे. उद्योग कोणत्याही राज्यात घेवून जायचे हा निर्णय उद्योगपती घेत असतात, असे प्रतिपादन जायंटस् वेल्फेअर फाउंडेशनशच्या अध्यक्षा शायना एन.सी. यांनी केले. यावेळी चितळे उद्योग समुहाचे गिरीष चितळे उपस्थित होते. सांगलीत जायंटस् वेल्फेअर फाउंडेशनच्यावतीने यंग जायंटस् अधिवेशनचे शायना एन.सी. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आले होते. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

शायना म्हणाल्या, महाराष्ट्रातील दोन उद्योग गुजरातमध्ये गेले. परंतु मेक इन इंडियामध्ये उद्योगाला कोणतीही सीमा नाही. आज उद्योग गुजरातमध्ये गेलेत. उद्या मध्यप्रदेशमध्ये परवा महाराष्ट्रात येतील. उद्योग कोठेही गेले तरी त्यांचे स्वागत आहे. उद्योग कोठे करायचा हा निर्णय उद्योगपती घेत असतात.  शायना पुढे म्हणाल्या, काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आले आहे. परंतु काँग्रेसची बोट बुडाली आहे. विरोधी पक्षाला विचार, दिशा असावी लागते, परंतु ती काँग्रेसकडे नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button