पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्याचा रविवार (दि. ३०) क्रिकेटप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने मेजवानी असणार आहे. टी-२० विश्वचषक २०२२ मधील ३ सामने उद्या खेळवले जाणार आहेत. बांग्लादेश वि. झिम्बाब्वे हा सामन्याला रविवारी सकाळी ८.३० ला सुरूवात होईल. तर नेदरलँड विरूद्ध पाकिस्तान या सामन्याला दुपारी १२.३० सुरूवात होणार आहे. भारत आणि झिम्बाव्बेविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागल्याने नेदरलँड विरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी महत्वपूर्ण असणार आहे. (Sunday Cricket Day)
या दोन सामन्यांशिवाय भारत वि. दक्षिण आफ्रिका हा सामना दुपारी ४.३० ला खेळवण्यात येणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी महत्वपूर्ण असेल. दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यास भारतीय संघ सेमी फायनलमध्ये धडक मारू शकतो. त्यामुळे भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष्य आहे. बांग्लादेश विरूद्ध झिम्बाब्वे हा सामना 'द गाबा' या स्टेडियवर खेळवण्यात येईल. तर नेदरलँड वि. पाकिस्तान आणि भारत वि. दक्षिण आफ्रिका हे सामने पर्थच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहेत. (Sunday Cricket Day)
टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ फेरीतील पहिल्या दोन सामन्यांत भारतीय संघाने दिमाखदार विजय मिळवला. भारताचा तिसरा सामना पर्थ स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेने आत्तापर्यंत २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, ऋषभ पंत, दीपक हुडा, हर्षल पटेल , युजवेंद्र चहल. (Sunday Cricket Day)
दक्षिण आफ्रिकेचा संघ : क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रोसो, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नार्खिया, तबरेझ शाम्सी, लुंगी एनगिडी, हेनरिक क्लासेन, मार्को जॅन्सन, रीझा हेंड्रिक्स. (Sunday Cricket Day)