Tiger Dead : चंकापूर नाल्यामध्ये मृतावस्थेत आढळली वाघीण

Tiger Dead : चंकापूर नाल्यामध्ये मृतावस्थेत आढळली वाघीण
Published on
Updated on

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : वाघांच्या वाढत्या मृत्यूमुळे वन विभाग चिंतेत असताना आणखी एका वाघिणीचा मृत्यू (Tiger Dead) झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. गस्तीवरील पथकाला नाल्यात वाघीण ­मृतावस्थेत दिसून आली. हिंगणा वनपरिक्षेत्रचे कर्मचारी शुक्रवारी (दि. २८) संध्याकाळी गस्त घालीत असताना उमरी (वाघ) येथील चंकापूर नाल्यामध्ये ३ते ४ वर्ष वयाची वाघीण मृतावस्थेत आढळली.

आज (दि.२९) सकाळी हिंगणा वनपरिक्षेत्रच्या कर्मचाऱ्यांनी एनटीसीएच्या मार्गदर्शक सूचनानुसार पोस्टमार्टम (Tiger Dead) केले. घटनास्थळी नागपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक पी. जी. कोडापे, सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, आशिष निनावे, वन परिक्षेत्र अधिकारी हिना राठोड, विजय गंगावणे, सारिका वैरागडे आदी उपस्थित होते.

शवविच्छेदन पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर भदांगे, डॉ. सुदर्शन काकडे, डॉ. सुजित कोलांगत यांनी केले. प्राथमिक माहितीनुसार वाघिणीचा मृत्यू हा हृदय श्वसन क्रिया बंद पडल्याने झाल्याचा अंदाज आहे. फॉरेन्सिक करीता नमुने घेण्यात आले आहेत. यापूर्वी २३ मार्च २०२१ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागवाडी परिक्षेत्राच्या शेजारील एफडीसीएमच्या रिसाला परिक्षेत्रात एक वाघ कुजलेल्या स्थितीत आढळून आला होता. या वाघाच्या शरीरावरील संपूर्ण केस गळून पडले होते. मात्र, पायाचे चारही पंजे कापले होते.

८ डिसेंबर २०१९ रोजी नागपूरमध्ये बिहाडा खाणीतील खड्ड्यात बुडून वाघाचा मृत्यू झाला होता. रामटेक वनपरिक्षेत्रातील मानेगाव परिसरातील बिहाडा खाणीमध्ये पडून पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला होता. पाण्यात पडल्यानंतर फुप्फुसामध्ये पाणी शिरल्याने वाघाचा गुदमरून मृत्यू झाला होता.

२० मार्च २०२२ रोजी नागपूर प्रादेशिक वनविभागातर्गंत येणाऱ्या मकरधोकडा उपवन परिक्षेत्रातील उदसा फॉरेस्ट बिटमध्ये वेकोलीला लागून असलेल्या नाल्यात विद्युत प्रवाह लागून वाघाचा मृत्यू झाला होता. रानडुकरांची शिकार करण्यासाठी वीटभट्टीशेजारील शेतात जिवंत विद्युत तारा बसविल्याचे सांगण्यात येत आहे. मृत डुक्कर खाऊन नंतर पाणी प्यायला गेलेल्या वाघाचा या तारांना स्पर्श झाल्याने मृत्यू झाला होता.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news