सांगली : जतपूर्व भागात भूकंपाचे सौम्य धक्के | पुढारी

सांगली : जतपूर्व भागात भूकंपाचे सौम्य धक्के

जत ; पुढारी वृत्तसेवा : जत पूर्वभागासह कर्नाटकातील विजयपूर व सीमावर्ती भागात शनिवारी सकाळी सहाच्या वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कर्नाटकातील विजयपूर भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. ४.९ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतू, सौम्य धक्के जाणवले आहे.

कर्नाटक सीमावर्ती भागात सकाळी ६.२२ च्या सुमारास वीस ते तीस सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे जतपूर्व ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. उमदी, माडग्याळ, संख, मुचंडी, बोर्गी, करजगी, कोंतेवबोबलाद, गिरगाव व मोरबगी आदी गावाच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. टीव्ही पाहणाऱ्या व घरात झोपलेल्या नागरिकांनी हे धक्के अनुभवले. घरातील भांडे पडणे, बंद पंखे हालणे, घर हलणे आदी बाबी नागरिकांना जाणवल्या. सुरुवातीला नेमकं काय सुरु आहे? याबबात नागरिक एकमेकांत चर्चा करत गोंधळून गेले होते. त्यानंतर भूकंप झाल्याची माहिती मिळाली .

कर्नाटकातील विजयपूर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू

जतपासून साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाटक राज्यात विजयपूर येथे भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. त्या ठिकाणी ४.९ रिस्टर स्केल भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. अद्याप कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. भूकंप झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून कुठे काय घडलं आहे का ? याची चौकशी केली जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button