पेण शहरात दुचाकी पार्किंगच्या वादात तरुणाचा मृत्यू | पुढारी

पेण शहरात दुचाकी पार्किंगच्या वादात तरुणाचा मृत्यू

पेण; पुढारी वृत्तसेवा : कामार्ली येथून मोटर सायकलवरून आलेल्या विजय पवार आणि रोहन पवार यांनी गजानन महाराज मंदिराजवळ असणाऱ्या नारळ सेंटरजवळ आपली मोटर सायकल पार्क केली. या कारणावरून नारळ सेंटरचे दुकानदार राजेंद्र बांदिवडेकर यांनी रोहन पवार यास मारहाण केली. यामध्ये रोहन पवार (वय २३) याचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि. ८) दुपारी घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कामार्ली येथून मोटर सायकलने पेणमध्ये आलेल्या दोघांनी आपली मोटरसायकल दिपीका नारळ सेंटर येथे उभी केली. यावेळी दुकानचे मालक राजेंद्र बांदिवडेकर यांनी येथे मोटारसायकल उभी करण्यास मनाई केली. तरीही तेथे वाहन पार्क केल्याचा कारणावरून बांदिवडेकर यांने रोहन पवार यास मारहाण केली.

या मारहाणीमध्ये तरूणाचा मृत्यू झाला. याबाबत विजय पवार यांनी पेण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी राजेंद्र बांदिवडेकर याच्यावर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

हेही वाचा;

Back to top button