महाड : किये गावात एकावर हॉकी स्‍टिक व चाकूने हल्‍ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

महाड : किये गावात एकावर हॉकी स्‍टिक व चाकूने हल्‍ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

महाड ; पुढारी वृत्‍तसेवा महाड तालुक्यामध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये गोळीबार, चाकूहल्ला अशा घटना ताज्या असतानाच महाड तालुक्यातील किये गावात एका (45 वर्षीय) इसमावर चाकू व हॉकी स्टिकने हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये काशिनाथ रमाकांत मालुसरे (वय 45) रा.किये, डांब्याची वाडी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारकरिता महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

परंतु काशिनाथ मालुसरे यांच्या गुडग्याला व अंगठ्याचा जबर जखम झाल्यामुळे त्यांना मुंबई येथे अधिक उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.

हल्लेखोर रामदास तुकाराम सणस, जानू धोंडीराम मालुसरे, सागर बारकु मालुसरे अशी हल्ला करणाऱ्या संशयीत आरोपींची नावे असून, ते हल्ला करून फरार झाले आहेत.

मागील भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला झाल्याचे समजते. सदर संशयीतां विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे हे करीत आहेत.

एकाच आठवड्यामध्ये तीन-तीन गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडल्यामुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा : 

Back to top button