The Kerala Story : अदा शर्मा-सुदीप्तो सेन यांच्या गाडीला अपघात, अभिनेत्रीने दिली हेल्थ अपडेट | पुढारी

The Kerala Story : अदा शर्मा-सुदीप्तो सेन यांच्या गाडीला अपघात, अभिनेत्रीने दिली हेल्थ अपडेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : द केरल स्टोरी फेम अदा शर्मा आणि चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या गाडीला अपघात झाला. रविवारी, १४ मे रोजी करीम नगर हिंदू एकता यात्रेला यांना सहभागी व्हायचं होतं. सोशल मीडियावर अपघाताचे वृत्त पसरले. (The Kerala Story ) काही तासांनंतर अभिनेत्री अदा शर्माने ट्विट करून सांगितले की, ती ठिक आहे. अदाने ट्विटमध्ये लिहिलं-मी ठिक आहे मित्रांनो. आमच्या अपघाताचे वृत्त व्हायरल होत आहे, त्यानंतर मला मेसेज य़ेत आहेत. (The Kerala Story)

अदाने ट्विटमध्ये दिलं हेल्थ अपड़ेट- आमची संपूर्ण टीम आता संपूर्णपुणे सुरक्षित आहे. कुठलीही चिंता नाही. कोणतीही मोठी घटना नाही. तुम्ही सर्वांना आमची काळजी केली. यासाठी धन्यवाद.

दरम्यान, अदा शर्माला द केरल स्टोरीवरून वादानंतर जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. लव जिहाद आणि धर्मांतर यांसारख्या मुद्द्यावर सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट आहे. पण, काही राज्यांमध्ये हा चित्रपट बॅन करण्यात आलाय.

Back to top button