Punjab court summons Mallikarjun Kharge | मल्लिकार्जुन खर्गे यांना कोर्टाचे समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण? | पुढारी

Punjab court summons Mallikarjun Kharge | मल्लिकार्जुन खर्गे यांना कोर्टाचे समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

पुढारी ऑनलाईन : नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंग दलाच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पंजाबमधील संगरूर न्यायालयाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Congress chief Mallikarjun Kharge) यांना समन्स बजावले आहे. हिंदू सुरक्षा परिषदेचे संस्थापक हितेश भारद्वाज यांनी खर्गे यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा दाखल केला आहे. दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) रमणदीप कौर यांच्या न्यायालयाने खर्गे यांना १० जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. (Punjab court summons Mallikarjun Kharge)

काँग्रेसने बजरंग दलाची देशविरोधी संघटनांशी तुलना केली आणि कर्नाटकात सत्तेवर आल्यानंतर बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासनही दिले, असा दावा हितेश भारद्वाज यांनी केला आहे. “जाहीरनाम्याच्या पान क्रमांक १० वर काँग्रेसने बजरंग दलाची देशविरोधी संघटनांशी तुलना केली आहे आणि सत्तेवर आल्यानंतर त्यावर बंदी घालण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. त्याविरोधात मी गुरुवारी न्यायालयात धाव घेतली,” असे भारद्वाज यांनी म्हटले आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या (Vishva Hindu Parishad) चंदीगड युनिटने यापूर्वी खर्गे यांना कर्नाटक निवडणुकीदरम्यान बजरंग दलाच्या विरोधात बदनामीकारक टिप्पणी केल्याचा आरोप करत त्यांना कायदेशीर नोटीस बजावली होती.

२२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली आहे. तर भाजपला ६६ आणि जेडीएसला १९ जागा मिळाल्या आहेत. . या निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला असून प्रेमाचे दुकान खुले झाले असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

हे ही वाचा :

Back to top button