घरोघरी टेन्शन, निवृत्तीनंतर किती मिळणार वाढीव पेन्शन ? | पुढारी

घरोघरी टेन्शन, निवृत्तीनंतर किती मिळणार वाढीव पेन्शन ?

अलिबाग; रमेश कांबळे :  भविष्य निर्वाह निधी योजनेंतर्गत (ईपीएस) अतिरिक्त भविष्य निर्वाह निधी मिळविण्याचा (पेन्शन) पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाला आहे. ईपीएसमध्ये एकूण योगदानाच्या ८.३३ टक्के अतिरिक्त रक्कम देण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सुधारित योजना २०१४ साठी ग्राह्य ठरविली होती.
यामुळे पेन्शनपात्र वेतनाची मर्यादा प्रतिमाह ६५०० रुपयांवरून ९९ हजार रुपये वाढविण्यात आली आहे. तसेच या मर्यादे- पेक्षा वेतन अधिक असल्यास सदस्यांना त्यांच्या नियुक्त्यांबरोबर आहे. प्रत्यक्ष वेतनाच्या ८.३३ टक्के रक्कम योगदान देण्याची परवानगी आहे. १ सप्टेंबर २०१४ नंतर निवृत्त झालेले कर्मचारी यांना पेन्शनसाठी संयुक्तरीत्या अर्ज करावे लागत आहे. यामुळेच गर्दी वाढत आहे.

अर्ज करण्यासाठी ३ मेपर्यंत मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भविष्य निर्वाह निधीसाठी अर्ज करण्याकरिता ३ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सेवानिवृत्तांनी पेन्शन कार्यालयात जाण्यापूर्वी ईपीएसचा नंबर व यूएएन नंतर सोबत ठेवणे आवश्यक आहे. ऑफलाइन फॉर्म भरल्यानंतर पुन्हा तो फॉर्म ऑनलाइन करावा लागतो, ही सर्व काळजी घेणे आवश्यक आहे.

अर्ज कोणी भरावा?

नव्या आदेशाप्रमाणे १ सप्टेंबर २०१४ नंतर सेवानिवृत्त झालेल्यांनीच अर्ज करावयाचा आहे. निर्देशाप्रमाणे वाढीव पेन्शनसाठी अर्ज केला आहे. त्यातून नेमके किती मिळणार याचा अंदाज येणे बाकी आहे. सध्या त्याचे गणित जुळवत आहे. कार्यालयामध्ये गर्दी- नागपूर येथेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय आहे. पाच जिल्ह्यातील कर्मचारी या कार्यालयात येरझाऱ्या घालत आहेत.

मला वाढीव पेन्शन मिळेल का?

 शासन वाटा किती भरला जाईल व त्यावरचे व्याजदर त्याचे गणित अद्याप जुळलेले नाही. तरी मोठी आशा आहे.                                                                                            – सुरेश गुरव, लाभार्थी.

Back to top button