रायगड : कळंबोलीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी | पुढारी

रायगड : कळंबोलीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : रायगड येथील कळंबोलीमध्ये शिवजयंती उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शिवप्रेमींसाठी खास देखाव्याचे आयोजन केले असून यात वाघ नख्याची प्रतिकृती दर्शविण्यात आली होती. ही प्रतिकृती दीडशे किलो वजनाची आणि ७ फूट- १५० फूट उंचीच्या वाघ नखे पाहायला मिळाली.

शिवजयंती उत्सव असल्याने कळंबोलीमधील नागरिक आणि शिवप्रेमींचा उत्साह पाहायला मिळाला. कळंबोलीमधील घाटी मराठी संघटना यांच्यातर्फे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. इतिहासाची आठवण व्हावी या उद्देशाने घाटी मराठी संघटने तर्फे ४थे वर्षे निगडित भव्य वस्तूचे प्रदर्शन पंकज सूर्यवंशी यांच्या संकल्पेतून केले आहे. शेकडो शिवभक्तांनी हातात मशाल घेऊन यावेळी महाराजांना मानवंदना दिली.

या प्रदर्शनात खास करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेल्या वाघ नखांची प्रतिकृती लक्षवेधी ठरली. ही प्रतिकृती दीडशे किलो वजनाची आणि ७ फूट- १५० फूट उंचीची होती.

हेही वाचा : 

Back to top button