भांबवडे येथे ईव्हीएम मशीन पडले बंद; मतदान प्रकिया दीड तास खोळंबली | पुढारी

भांबवडे येथे ईव्हीएम मशीन पडले बंद; मतदान प्रकिया दीड तास खोळंबली

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानास आज दि ७ मे रोजी सकाळी ७ वाजता सुरूवात झाली भोर तालुक्यातील भांबवडे येथील बुथ क्रमांक ४५५ वर सकाळी सुरूवातीचे ५ मतदान झाल्यानंतर ई.व्ही.एम मशिन बंद पडली होती. तब्बल दीड तासानंतर पुन्हा ईव्हीएम मशीन चालू झाल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. बारामती लोकसभा येथील मतदान आज होत असून सकाळी वाजेपर्यंत मतदानाची वेळ लोकशाही उत्सव व विवाहाचे तिथी मोठ्या असल्याने अनेक गावात लग्न समारंभचे कार्यक्रम व उन्हाचा चढता परा लक्षात घेता सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदारांनी रांगा लावल्या होत्या.

त्यानंतर तुरळक मतदार मतदान केंद्रावर दिसत आहे. परंतु भांबवडे येथे सकाळ चे ७ वाजून १० मिनिटाला पहिले पाच मतदान झाले त्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया खोळंबल्याने ई.व्ही.एम मशीनचा संच बदलण्यात आला. मतदान ८ वाजून ५० मी पुन्हा सुरळीत सुरूवात झाली. मशिन संच बदलण्यास व मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यास तब्बल १ तास ४० मी चा वेळ लागला.

हेही वाचा

Back to top button