रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत ३३.९१ टक्के मतदान | पुढारी

 रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत ३३.९१ टक्के मतदान

सिंधुदुर्गनगरी: पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 33.91 टक्के  मतदान झाले. तर सकाळच्या सत्रात सात ते नऊ या कालावधीत केवळ 8.29 टक्के  इतकेच मतदान झाले होते. तर 11 वाजेपर्यंत 21.19 टक्के मतदान झाले होते.

सकाळी नऊ वाजल्यानंतर सर्वच मतदान केंद्रांवर गर्दी दिसत होती. मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत  मतदारसंघात एकूण 21.19 % एवढे मतदान झाले होते. तर दुपारी एक वाजेपर्यंत 33.91 टक्के एवढे मतदान झाले आहे.  यात चिपळूण 37.09, रत्नागिरी 28, राजापूर 37.05, कणकवली 31.59, कुडाळ 32.88 तर सावंतवाडी 36.65 टक्के मतदान झाले आहे.

हेही वाचा 

Back to top button