मतदार यादीतील सातशे नावे गायब : खडकवासला येथील प्रकार | पुढारी

मतदार यादीतील सातशे नावे गायब : खडकवासला येथील प्रकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीतून नावे गायब झाल्याची सातशे जणांनी तक्रारी केल्या आहेत. मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांकडून पुन्हा सहा क्रमांकाचा अर्ज भरून घेतला जाणार असून, त्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली.

मतदारयादीत नावे न आढळता अनेकांची नावे दुसर्‍या भागात गेल्याचे आढळले आहे. तर अनेकांना आपला विधानसभा मतदारसंघ कोथरूड की खडकवासला हेच कळत नाही. त्यामुळे नावे शोधण्यात अनेक अडचणी येत असल्याचेद्विवेदी यांनी नोंदविले. मतदार यादीतून मयतांची नावे वगळली आहेत. इतरांची नावे वगळली नाहीत. मतदान केंद्रावर नाव आढळल्यास इपिक कार्ड हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. त्याच्या आधारे मतदान करता येईल. त्यामुळे पुरावा नाही म्हणून मतदानापासून कोणी वंचित राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मतदान केंद्रावर मोबाईल नको…

मतदान केंद्रावर मतदानाला जाताना सोबत मतदारांनी मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मोबाईलद्वारे मतदान केंद्रात मतदान करतानाचे फोटो अथवा व्हिडिओ काढू नये, असेही आवाहनही केले आहे.

हेही वाचा

Back to top button