LokSabha Elections 2024 | जिल्ह्यामध्ये 21 महिला नियंत्रित मतदान केंद्र | पुढारी

LokSabha Elections 2024 | जिल्ह्यामध्ये 21 महिला नियंत्रित मतदान केंद्र

पुणे : लोकसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ’महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 21 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्व जण महिला असतील.

लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र असणार आहेत. सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही. त्यानुसार जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांत 21 मतदान केंद्रांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महिला नियंत्रित मतदान केंद्र स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला नियंत्रित मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी महिला असतील. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यानजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकार्‍यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला नियंत्रित मतदान केंद्राचे नियोजन केले आहे. या मतदान केंद्रांचे व्यवस्थापन सर्व महिला कर्मचारी करणार आहेत.

– ज्योती कदम, निवासी उपजिल्हाधिकारी

हेही वाचा

Back to top button