छत्रपती संभाजीनगरच्या तनिषाची कमाल; बारावी कॉमर्समध्ये १०० टक्के मिळवले

छत्रपती संभाजीनगरच्या तनिषाची कमाल; बारावी कॉमर्समध्ये १०० टक्के मिळवले
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : बारावी परीक्षेत कॉमर्स शाखेतून १०० टक्के गुण प्राप्त करत शहरातील तनिषा बोरमणीकरने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तनिषा छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी कॉलेजमध्ये शिकत होती. बारावीच्या परिक्षेत १०० टक्के गुण मिळवणारी तनिषा ही राज्यातील एकमेव मुलगी आहे. तनिषाला १०० टक्के गुण मिळाल्याने तिचे वडील सागर व आई रेणुका यांच्या आनंदाला उधाण आले आहे.

याबाबत तनिषासोबत संवाद साधला असता तिने आई वडिलांनी कुठलेही प्रेशर न दिल्याने तसेच मोकळीक दिल्याने हे शक्य झाल्याचे सांगितले. खरं तर ९५ टक्के मिळतील, अशी आशा होती. परंतु १०० टक्के मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. बुद्धिबळ आणि अभ्यास याचा योग्य संगम साधण्यात आलेले यश आहे.

तनिषाचे वडील आर्किटेक्ट तर आई या चार्टर्ड अकाउंटंट आहेत. या दोघांमुळे घरातील वातावरण देखील आनंदी असते. याचा देखील फायदा झाल्याचे तनिषाने सांगितले. तर आई रेणुका यांनी, तिला बुद्धिबळ खेळण्यासाठी देखील कधी बळजबरी केली नाही, तशीच अभ्यासाची देखील कुठलीही बळजबरी नव्हती. तिने आजवर बुद्धिबळामध्ये यश मिळवले होते. आता तसेच यश अभ्यासात देखील मिळवल्याने मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news