टोलमध्ये केली ‘इतकी’ वाढ; वाहनचालकांच्या खिशाला फटका | पुढारी

टोलमध्ये केली 'इतकी' वाढ; वाहनचालकांच्या खिशाला फटका

खेड-शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दि. 1 एप्रिलपासून खेड-शिवापूर टोलनाक्यावरील टोलमध्ये वाढ करण्यात येणार आहे. ही वाढ अडीच ते तीन टक्के होणार असल्याचे टोल प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांना आता अधिकचा टोल भरावा लागणार आहे. सन 2010 पासून खेड-शिवापूर टोलनाका सुरू झाला आहे. तेव्हापासून दरवर्षी काही टक्क्यांनी वाढ होत आहे. वाहनचालकांनी मात्र या दर वाढीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सन 2023/24 मध्ये चारचाकी वाहनाला 115 रुपये टोल आकारला जात होता. आता तो 120 रुपये होणार असून, हलक्या वाहनांना 185 ऐवजी 190, त्याचप्रमाणे ट्रक व बससाठी 390 ऐवजी 400 आणि एमएव्ही 3 रुळश्र साठी 415 वरून 420 तर 6 रुळश्र साठी 615 वरून 630 अशी साधारण पाच ते पंधरा रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

टोलमध्ये नियमानुसार वाढ

दरवर्षी टोलमध्ये नियमानुसार वाढ होत असते. या पार्श्वभूमीवर या वर्षीही एक एप्रिलपासून फक्त अडीच टक्केच वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती टोलनाका व्यवस्थापक अमित भाटिया व उपव्यवस्थापक बद्रीप्रसाद शर्मा यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button