Loksabha election | पुणे भाजपामधील धुसफूस चव्हाट्यावर; ‘या’ माजी खासदाराची नाराजी उघड | पुढारी

Loksabha election | पुणे भाजपामधील धुसफूस चव्हाट्यावर; 'या' माजी खासदाराची नाराजी उघड

 पुणे : पुण्यात भाजपामध्ये अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर…. महायु्तीकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुण्यातील भाजपाचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काल मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांची भेट घेत नाराजी धूर करण्याचा प्रयत्न केला. माझ्या उमेदीच वय मी पक्ष्यासाठी दिला आहे. माझा पक्षाने विचार करावा असं देखील काकडे यांनी रवींद्र चव्हाण यांना सांगितलं आहे. देशामध्ये उमेदवारी जाहीर होऊन देखील स्थानिक परिस्तिथी पाहता उमेदवार बदलेल जातात त्यामुळे AB फॉर्म पक्षाने देई पर्यंत मी इच्छुक आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे उमेदवार बदलावा अशी मागणी केली आहे. यानिमित्ताने पुणे भाजपमधील धुसफूस समोर येत आहे.

 मी इच्छुक होतो हे जग जाहीर आहे : संजय काकडे

मी इच्छुक होतो हे जग जाहीर आहे. मी 100% नाराज आहे. मी नगरसेवकांना बैठकीला जावू नका असं सांगितलं नाही. मुरलीधर मोहोळाचं नावं घोषित झालेले आहे पण AB फॉर्म दिलेला नाही. रवींद्र चव्हाण आणि माझी मैत्री आहे. त्यामुळे ते मला भेटायला आले होते. मी आजपण इच्छुक आहे, माझा मुरलीधर मोहळ यांना विरोध नाही. मी जो सर्वे केला आहे तो रवींद्र चव्हाण यांना सांगितला. मी 6 वर्ष खासदार होतो. मी हे या अगोदर देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे. पक्षाचं काम थांबवा असं मी कोणालाही सांगितलेलं नाही. रडल्याशिवाय आई देखील बाळाला जवळ घेत नाही. आणि दूध देत नाही.  एकनाथ शिंदेची शिवसेना आमच्याबर आहे. पण पुण्यात कोणती शिवसेना स्ट्रॉग आहे हे पूर्ण पुणे शहराला माहित आहे.

हेही वाचा

Back to top button