Loksabha elecation | मी काय फक्त बारामती ,बारामती करायला आलेलो नाही : अजित पवार | पुढारी

Loksabha elecation | मी काय फक्त बारामती ,बारामती करायला आलेलो नाही : अजित पवार

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील नामांकित वस्ताद व कुस्तीगीरांचा स्नेह मेळावा पार पडला.पुण्यातील महालक्ष्मी लॉन्स येथे मेळावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा आर पडला. त्यावेळी अजित पवार बोलत होते.

अजित पवार उवाच..

अनेकांकडून दिशाभूल करण्याचं काम सुरुये. क्रीडा, सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रात मी काम करत आलोय. कुठंच अडचणी येऊन द्यायच्या नाहीत, हेच माझं धोरण राहिलं आहे. मला बारामती लोकसभेतील पैलवानांची मदत घ्यायची आहे, असं मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. त्यासाठी आपण आज वस्ताद आणि पैलवानांचा मेळावा आयोजित केला आहे. पैलवानांचा मोठा वारसा आपल्या राज्याला लाभलेला आहे. महाराष्ट्र केसरीच्या पातळीवर आपण हे अनुभवतो. कुस्तीच्या महासंघातील वादाचे पडसाद गल्ली ते दिल्लीपर्यंत पाहायला मिळाले. हे वाद आपल्याला मिटवायचे आहेत. त्यासाठीच आज आपण हितगुज साधत आहोत.

आम्ही साधुसंत नाही. आम्ही राजकीय नेते आहोत. तुमच्या सहकार्याने आम्ही सरकार चालवतो. पैलवानांना ही प्रतिनिधित्व करता यावं, यासाठी आपण पुणे लोकसभेत मुरलीधर मोहोळांना उमेदवारी दिलेली आहे. तुमच्यातील एक सहकारी मुरलीधर मोहोळांच्या रूपाने लोकसभेत जाणार आहे. एकंदरीत कल पाहता मोहोळ मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, यात कोणतीही अडचण वाटत नाही. मी काय फक्त बारामती….बारामती करायला आलेलो नाही. मी कोणत्याही स्वार्थासाठी तुम्हाला बोलावलेलं नाही. शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती अशा चार ही लोकसभेत पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे. मी दोन-दोन मिनिटं कोणाला बोलायला देणार नाही. बोलायला दिलं की फाटे फुटतात. असेही अजित पवार म्हटले.

हेही वाचा

Back to top button