Crime News : चेन्नई-दौंड दरम्यान रेल्वे गाडीमध्ये ८ लाखांच्या ऐवजावर चोरट्याचा डल्ला ! | पुढारी

Crime News : चेन्नई-दौंड दरम्यान रेल्वे गाडीमध्ये ८ लाखांच्या ऐवजावर चोरट्याचा डल्ला !

दौंड: पुढारी वृत्तसेवा : चेन्नई – मुंबई एक्सप्रेस रेल्वे गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा १५ तोळे सोने व एक किलो चांदी चा ऐवज चेन्नई ते दौंड या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याची तक्रार राहुल शेषराव (वय २६ वर्ष रा. सुब्रमाने, कोयल स्टेट जवळ प्रार्थना गॅस एजन्सी कांजीपुरम)यांनी आँनलाईन नोंदवली आहे. बुधवारी (दि.२०)रोजी हा प्रकार घडला. शेषराव हे चेन्नई-मुंबई या गाडीने बोगी नंबर एम ७ ने प्रवास करत होते प्रवासा दरम्यान त्यांच्याजवळ दोन बॅगा होत्या त्यापैकी एका बँगेत हा आठ लाख दहा हजाराचा ऐवज होता.

सकाळी सहाच्या सुमारास ही गाडी दौंड रेल्वे स्थानकात येण्यापूर्वी त्यांच्या लक्षात आले की आपल्याजवळ असलेली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली तेव्हा त्यांनी तात्काळ गाडीमध्ये असलेल्या तिकीट तपासणीसास हा प्रकार सांगितला, त्यांनी तात्काळ ऑनलाईन तक्रार नोंदवली रेल्वेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती दौंड रेल्वे पोलिसांना दिली यावरून दौंड रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस नाईक पानसरे हे करत आहेत. हा गुन्हा ऑनलाईन दाखल केल्याने पुणे येथून दौंड रेल्वे पोलिसांकडे वर्ग झाला आहे. दौंड रेल्वे हद्दीमध्ये सध्या चोरटे धुमाकूळ घालत असून पोलिसांना ते सापडत नाहीत. दौंड रेल्वे स्थानकावर अनेक गुन्हे घडत असतात परंतु अनेक प्रवासी प्रवास करायचा असल्याने तक्रार द्यायच्या भानगडीत पडत नाहीत त्यामुळे रेल्वे पोलीस व आर पी एफ यांनी गस्त वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

हेही वाचा

Back to top button