Shirur Lok Sabha : राष्ट्रवादीचं ठरलं ! आ. मोहिते पाटीलांची आढळरावांना मदत | पुढारी

Shirur Lok Sabha : राष्ट्रवादीचं ठरलं ! आ. मोहिते पाटीलांची आढळरावांना मदत

राजगुरुनगर ; पुढारी वृत्तसेवा : माझा विरोध असतांनाही पक्षश्रेष्ठींनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षहितासाठी, तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी आढळराव पाटील यांचे लोकसभेला काम करणार आहे. यासाठी बुधवारी ( दि २०) तालुक्यातील निवडक कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या वेळी उपस्थीत राहुन मार्गदर्शन करणार आहेत त्यावेळी कार्यकर्ते आपली भुमिका स्पष्ट करतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.

शिरूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी सोमवारी (दि १८) मुंबई येथे विशेष बैठक झाली. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विलास लांडे,प्रदीप कंद आणि भोसरी, शिरूर वगळता सर्व आमदार उपस्थित होते.यावेळी आढळराव पाटील यांच्या उमेदवारी बाबत चर्चा झाली. त्यानुसार आढळराव पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे. पण पक्षाच्या हितासाठी अजित पवार सांगतील ते काम करणार आहे. लोकसभेला खेड नेहमीच निर्णायक भूमिका घेतो.मात्र राजकिय निर्णयप्रक्रियेत वरिष्ठांकडून खेड वर कायमच दुर्लक्ष केले जाते असा आरोप आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी करीत आपली नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा

Back to top button