कृष्णविवरांत सापडली क्ष-किरणांची खाण : आयुकाच्या शास्त्रज्ञांना मिळाले पुढचे यश | पुढारी

कृष्णविवरांत सापडली क्ष-किरणांची खाण : आयुकाच्या शास्त्रज्ञांना मिळाले पुढचे यश

पुणे : अवकाशातील कृष्णविवरांचे (ब्लॅक होल) चारही बाजूंनी निरीक्षण करण्यात शास्त्रज्ञांना प्रथमच यश आले असून, यात मऊ, कठोर क्ष-किरणांसह अतिनील किरणांची खाणच सापडली असून, त्यांच्या तरंग लांबीची निरीक्षणे नोंदवता आली. जगात प्रथमच अशा प्रकारचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केल्याचा दावा आयुकाने केला आहे. भारताने अ‍ॅस्ट्रोसॅट हा उपग्रह 2016 मध्ये अवकाशात कृष्णविवरांच्या अभ्यासासाठी सोडला. याद्वारे आता शास्त्रज्ञांना कृष्णविवरातील (ब्लॅक होल) रहस्ये उलगडण्यास सुरुवात झाली आहे. पुणे आयुकातील (आंतर विद्यापीठीय खगोल विज्ञान व संशोधन केंद्र ) डॉ.गुलाब देवांग व डॉ.सीमंता बॅनर्जी या दोन शास्त्रज्ञांनी यातील क्ष किरणांची दाखविलेली क्षमता मोजण्यात यश आले आहे.

जगात प्रथमच कृष्णविवरांचा सर्व बाजूंनी अभ्यास करण्यात यश आले आहे. अ‍ॅस्ट्रोसॅट या उपग्रहात चार पेलोड आहेत.यांनी एकाच वेळी सर्व बाजूंनी कृष्णविवरांची निरीक्षणे प्रथमच नोंदवली आहेत.त्यामुळे विवरांचा एकत्रित अभ्यास करता येत आहे. याद्वारे कृष्णविवरांच्या आत बाहेर काय दडले आहे, त्यांचा आकार कसा आहे, याचा प्रथमच शोध घेता येणार आहे.
– डॉ.गुलाब देवांग, शास्त्रज्ञ, आयुका, पुणे

आयुकाची ऐतिहासिक कामगिरी

या मोहिमेतील सॉफ्ट एक्स-रे डेटाने निष्कर्षांना आणखी बळ दिले आहे. हा अभ्यास स्ट्रोसॅटच्या इतिहासातील एक महत्त्वाची उपलब्धी असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.यात क्ष किरणांच्या बहु-तरंग लांबी क्षमतांचा वापर करण्यात आला आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या समवेत, युनायटेड किंगडम, अबू धाबी आणि पोलंडमधील संशोधकांचाही यात समावेश आहे.

पृथ्वीपासून 9800 प्रकाशवर्षे अंतरावर

कृष्णविवर हे गुंतागुंतीच्या गुरुत्वाकर्षणाच्या परस्पर संवादात गुंतलेला एक तारा असतो. त्याला एक गुरुत्वाकर्षण राक्षस असेही संबोधले जाते.त्याच्या चमकदार प्रतिरूपावरील सामग्री ब्लॅक होलच्या दिशेने आकर्षित होतात. हे कृष्ण विवर आपल्या पृथ्वीपासून सुमारे 9 हजार 800 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. हे असेच क्षणिक कृष्णविवर आहे ज्यात क्ष किरणांची खाण आहे.

पृथ्वीच्या जवळ असल्याने लागला शोध

शास्त्रज्ञांना 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उपकरणाच्या स्फोटादरम्यान हे विवर दिसले. पृथ्वीच्या तुलनेने जवळ असल्यामुळे व क्ष किरणांमुळे आकाशातील दुसरी सर्वात तेजस्वी वस्तू म्हणून उदयास आलेले विवर आहे. यातील विविध इलेक्ट्रोमॅग्नेटिक बँडवर अनेक निरीक्षण मोहिमेला उजाळा मिळाला आहे.

हेही वाचा

Back to top button