Pune : शिरूर लोकसभेचा काँग्रेसकडून आढावा | पुढारी

Pune : शिरूर लोकसभेचा काँग्रेसकडून आढावा

चाकण : महाराष्ट्रातील उद्योगधंदे अन्य राज्यांत जातात, स्पर्धा परीक्षांमधील घोटाळेबाजांवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ खेड तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी चाकण (ता. खेड) येथे ’रास्ता रोको’ आंदोलन केले. या वेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या विविध धोरणांवर या वेळी जोरदार टीका करण्यात आली. शिरूर लोकसभा मतदारसंघ व सर्व विधानसभा मतदारसंघांचा आढावा पुणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने चाकण येथील महात्मा फुले मार्केटच्या सभागृहात रविवारी (दि. 4) घेण्यात आला. तत्पूर्वी, शासनाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.

या वेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे पक्षाचे निरीक्षक रामहरी रूपनवर, सत्यशील शेरकर, कैलास कदम, विजय डोळस, महेश ढमढेरे, जमीर काझी, महेश टापरे, आनंद गायकवाड, नीलेश कड पाटील, वंदना सातपुते, अनुराग जैद, गणेश शहाणे, गीता मांडेकर, अतिश मांजरे आदी या वेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील शिरूरसह बारामती, मावळ लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

Back to top button