Rajkumar Anand joins BSP: ‘आप’चे राजकुमार आनंद ‘बसपा’त: नवी दिल्लीतून लोकसभा लढवणार  | पुढारी

Rajkumar Anand joins BSP: 'आप'चे राजकुमार आनंद 'बसपा'त: नवी दिल्लीतून लोकसभा लढवणार 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे पदाधिकारी राजकुमार आनंद यांनी बहुजन  समाज पक्षात प्रवेश घेऊन नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या उमेदवार बासुरी स्वराज आणि आपचे सोमनाथ भारती यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. Rajkumar Anand joins BSP

दिल्लीत पहिला दलित मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न साकारण्यासाठी मी बसपामध्ये प्रवेश घेतला. भ्रष्टाचार करणाऱ्या आम आदमी पक्षात मला रहायचे नसल्यामुळे मंत्रिपद आणि पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे राजकुमार आनंद यांनी सांगितले. Rajkumar Anand joins BSP

पटेलनगर मतदारसंघातील आमदार असलेले राजकुमार आनंद यांनी यापूर्वी २०१५ मध्ये पत्नीसह आपचा राजीनामा दिला होता. त्यांनतर पुन्हा आपमध्ये सामील झाल्यावर २०२२ मध्ये त्यांचा दिल्ली मंत्रिमंडळात  समावेश झाला होता. हवाला पेमेंट आणि जकात शुल्क बुडविण्याच्या आरोपाखाली ईडीने चौकशी करून त्यांच्या निवासस्थानावर धाड टाकली होती.

हेही वाचा 

Back to top button