दौंड शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ | पुढारी

दौंड शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ

दौंड : पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरात मोकाट कुत्र्यांनी नुसता धुमाकूळ घातला असून नगरपालिकेने याकडे कानाडोळा केला आहे.
याचा फटका शालिमार चौक येथील विनोद कांबळे यांना बसला. त्यांनी आपल्या घराबाहेर बांधलेल्या या तीनही बकऱ्यांना अक्षरशः फाडून खाल्ले आहे. यामध्ये कांबळे यांचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. दोन वर्षांपूर्वी शहरात कुत्रा चावल्याने एका युवकाचा मृत्यू झाला होता. परंतु नगरपालिकेकडून ठोस अशी उपाययोजना झाली नाही. नगरपालिकेने मोकाट जनावरे पकडण्याचे टेंडर काढले, परंतु कुत्रे पकडले की काही व्यक्ती या कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात व ते कुत्रे पुन्हा सोडायला लावतात. त्यामुळे प्रशासन देखील हतबल झाले आहे. शहरातील एखाद्या व्यक्तीला या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला तर त्याला नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आतातरी दौंड नगरपालिकेने शहरातील मोकाट जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे

Back to top button