हायप्रोफाईल सेक्स रॅकेट : पुण्यातील कल्याणी देशपांडेला संभाजीनगर पोलिसांकडून अटक | पुढारी

हायप्रोफाईल सेक्स रॅकेट : पुण्यातील कल्याणी देशपांडेला संभाजीनगर पोलिसांकडून अटक

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : हायप्रोफाईल सेक्स रॅकेट प्रकरणात पुण्यातील कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे (वय ५५, रा. बालाजी निवास, पाषाण -सुस रोड बाणेर, पुणे) हिला संभाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली. शहरात सेनानगर भागात चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर सिडको पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी देहविक्री करण्याठी दिल्लीच्या दोन मुली आणि एक विदेशी मुलगी हिची सुटका करण्यात आली होती. देहविक्री व्यवसायासाठी दिल्लीच्या दोन मुली पाठविल्याच्या आटोपावरून कल्याणीला अटक करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको पोलिसांनी सिडको भागात तांबट कोचींग क्लासेस येथे चालणाऱ्या सेक्स रॅकेटवर कारवाई केली. तांबट कोचींग क्लासेसमधील आरोपींकडून शहरात हायप्रोफाईल रॅकेट सातारा परिसरात चालत असल्याची माहिती समोर आली. या माहितीवरून सेना नगर भागात एका बंगल्यात चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. हे सेक्स रॅकेट हा तुषार राजपुत हा चालवित होता. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून केलेल्या चौकशीत दिल्ली येथील दोन मुली या पुण्यातील एका महिलेने पाठविल्याची माहिती समोर आली. तर विदेशी महिलेला दिल्लीत एका व्यक्तीने पाठविल्याचे समजले.

या माहितीवरून सिडको पोलिसांनी पुढे ही माहिती गुन्हे शाखेला पुण्याच्या महिलेची माहिती दिली. गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक विशाल बोडखे यांच्या पथकाने पुण्याला जाऊन कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हिला ताब्यात घेतले. कल्याणी हिला पुढील कारवाईसाठी सिडको पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस उपनिरिक्षक विशाल बोडखे सह सहायक फौजदार सतीश जाधव, पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रकाश चव्हण, विलास कोतकर, पोलिस अंमलदार संदिप राशीनकर, राहुल खरात, काकासाहेब अधाने, संजिवणी शिंदे यांनी ही ही कारवाई केली.

मुली पुरविणाऱ्या महिलेवर ३०२ सह अन्य गुन्हे

पुण्याच्या बाणेर रोड येथून ताब्यात घेण्यात आलेल्या कल्याणी उर्फ जयश्री उर्फ उमेश देशपांडे या महिलेवर पुण्यात कोथरूड, हवेली, मालवणी, चतुश्रुंगी,डेक्कन या पोलिस ठाण्यात देह विक्रीचा व्यवसाय करण्यासह एकुण दहा गुन्हे दाखल आहेत. जयश्री उर्फ कल्याणी देशपांडे हिच्यावर हवेली पोलिस ठाण्यात एका खुन प्रकरणात गुन्हा दाखल आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

तुषार राजपुत सह चार जणांच्या पोलिस कोठडीत वाढ

शहरात हाय प्रोफाईल रॅकेट चालविणाऱ्या तुषार राजपुत याच्यासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात त्यांची पोलिस कोठडी ही २० जानेवारीला संपत होती. पोलिस निरिक्षक गिता बागवडे यांनी न्यायलयात तुषार राजपुत सह अन्य आरोपीला हजर केले. कोर्टासमोर तुषार सह अन्य आरोपींनी दिलेल्या माहितीवरून वाहने जप्त करण्यात आली आहे. तसेच मुली पाठविणाऱ्या एका महिलेला अटक झाल्याचीही माहिती कोर्टात दिली. शहरात देहविक्रीच्या संबंधीत अन्य माहिती तुषार सह अन्य आरोपींकडून घ्यायची असल्याचे म्हणणे मांडले. कोर्टाने पाचही आरोपींना पाच दिवसाची पोलिस कोठडी सूनावली..

Back to top button